टीम इंडियाचा ‘हा’ क्रिकेटर कधीही झाला नाही Run Out!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० जानेवारी । एखादी मोठी खेळी करणं ही प्रत्येक फलंदाजाची इच्छा असते. भारताने आतापर्यंत उत्तम असे फलंदाज जगाला दिले आहेत. यामध्ये असे काही फलंदाज आहेत जे त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीच रनआऊट झाले नाहीत. आज आपण अशाच एका बड्या भारतीय खेळाडूबद्दल जाणून घेणार आहोत जो त्याच्या कारकिर्दीत एकदाही रनआऊट झाला नाही.

भारतात क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेणारे कपिल देव त्याच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत कधीही रनआऊट झालेले नाहीत. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 1983 मध्ये वेस्ट इंडिज टीमचा पराभव करून पहिला वनडेचा वर्ल्डकप जिंकला होता.

कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध 175 रन्सची इनिंग खेळली होती. कपिल देव हे नेहमीच त्यांच्या धडाकेबाज फलंदाजी आणि उत्तम बॉलिंगसाठी ओळखले जायचे.

कपिल देव हे भारतातील महान खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांच्यामुळेच भारतात क्रिकेट लोकप्रियेच्या शिखरावर जाऊन पोहोचलं आहे. कपिल देव यांनी 1978 मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताकडून कसोटी पदार्पण केलं होतं.

कपिल देव यांनी भारतासाठी 131 कसोटी सामन्यांमध्ये 5248 रन्स आणि 434 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3000 हून अधिक रन्स आणि 253 विकेट्स घेतल्यात. कपिल देव यांनी 1978 ते 1994 या 16 वर्षांच्या कारकिर्दीत एकही नो बॉल टाकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *