महाभयंकर कोरोना व्हायरस ला रोखणारी लस तयार पण…. काय आहे समस्या ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई ; जगभरात 3 लाखांपेक्षा जास्त लोकं कोरोनाव्हायरसच्या विळख्यात आहेत, तर या व्हायरसने 13 हजार लोकांचा बळी घेतला आहे. या व्हायरसला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत, आवश्यक ती पावलं उचलत आहेत. उपलब्ध असलेल्या औषधांचा वापर करून डॉक्टर उपचार करत आहे, तर दुसरीकडे या व्हायरसला रोखेल अशी लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञांची धडपड सुरू आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं जगभरात कोरोनाव्हायरसविरोधात कमीत कमी 20 लस विकसित झालेल्या असल्याचं म्हटलं आहे. त्यापैकी काही लसींचं ह्युमन ट्रायलही सुरू झालं आहे. मात्र या लसी खरंच यशस्वी आणि सुरक्षित असल्याची खात्री झाल्यापासून त्याला परवानगी मिळण्यासाठी किमान 18 महिने लागतील. म्हणजे दीड वर्षांनीच कोरोनाव्हायरसविरोधातील लस उपलब्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *