महाराष्ट्र २४- ऑनलाईन – पुणे ; कोरोना विषाणूचा संसर्ग अखेर सांगली जिल्ह्यात येऊन पोहोचला आहे. कोरोनाची लागण झालेले चार रुग्ण इस्लामपुरात सापडले आहेत. सोमवारी या चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी दिली. अधिकार्यांनी दिलेल्या या माहितीने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. लोकांतही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या आणखी एका रुग्णाच्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोनवर गेली आहे. चोवीस तासातच दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्हा हादरला आहे. हा रुग्ण कॅलिफोर्नियावरून हिंदुस्थानात परतला होता. सदर रुग्णाचे वय हे ६३ असल्याचे सांगण्यात आले आहे.