![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३१ जानेवारी । तुम्हालाही लग्नसराईत सोने (Gold) खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून नवीन व्यापारी आठवडा सुरू होत आहे. आज नवीन ट्रेडिंग आठवड्याचा पहिला दिवस आहे. याआधी गेल्या व्यापार आठवड्यात सोन्याबरोबरच सराफ बाजारात चांदीच्या (Gold Silver Rate) दरात मोठी घसरण झाली होती. (Check Today’s Gold Silver Price Updates)
आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,००० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,००० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,००० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,०९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,००० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,१५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,००० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,०९० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१२ रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)