महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३१ जानेवारी । दोन दिवसांपासून सकाळी थंडीचा कडाका, तर दिवसा उन्हाची तीव्रता यामुळे नागरिकांना दोन्ही वातावरणाचा अनुभव येत आहे. रविवारीदेखील राज्यात ठिकठिकाणी उन्हाची तीव्रता वाढली होती. परंतु गार वाऱ्यामुळे थंडीही जाणवत होती. दरम्यान, तिसरे पश्चिमी प्रकोप ६ फेब्रुवारीला उत्तर भारतात पश्चिम हिमालयातील राज्यात येण्याची शक्यता आहे, त्याचा हवामानावर परिणाम होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ४ ते १० फेब्रुवारीदरम्यान थंडीचा प्रभाव जाणवणार असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान
जळगाव ५.०, अहमदनगर ७.०, नागपूर ७.९, नाशिक ८.४, अमरावती ८.८, औरंगाबाद ९.२, वर्धा ९.४, अकोला १०.१, बुलडाणा – १०.५,सोलापूर ११.०