महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३१ जानेवारी । अश्लील, शिवीगाळ आणि धमकी देणारे व्हिडिओ ‘थेरगाव क्वीन’ या इंस्टाग्राम प्रोफाईलवर शेअर केल्याप्रकरणी दोन 18 वर्षीय मुलींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, या तरुणीचे साक्षी असे नाव आहे. ही तरुणी पिंपरी चिंचवड भागात लेडी डॉन म्हणून वावरत होती.
आपल्या इंस्टाग्रामवर 50000 लाईक्स मिळावे यासाठी अनेक अश्लील शिव्या असणारे व्हिडिओ बनवले. एवढेच नाही तर तिने 302 म्हणजेच खून करण्याची धमकी देखील दिली होती. त्यामुळे पोलिसांनी तिच्यासह तिला व्हिडिओत मदत करणाऱ्या मैत्रिणींवर देखील गुन्हे दाखल केले आहेत.
ही इंस्टाग्राम क्वीन वादग्रस्त व्हिडिओ तसेच अश्लील भाषा वापरुन रिल्स तयार करायची. तिच्या सोबत तिच्या दोन मैत्रिणी देखील असायच्या. अश्लील शिवीगाळ यासाठी ही तरुणी ओळखली जात होती. आपणही कदाचित या क्वीनचे अनेक व्हिडिओ बघितले असतील. मात्र या क्वीनला अश्लील भाषा वापरणे आता चांगलेच महागात पडले आहे. ही कारवाई वाकड पोलिसांनी केली असून, तिच्यासह दोन मैत्रिणींना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक केल्यानंतर सोशल मीडियावर या थेरगाव क्वीनचे फोटो जोरात व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर वादग्रस्त आणि अश्लील भाषा तसेच मुलींना बलाकाराच्या धमक्या देणारे तिचे व्हिडीओज प्रचंड व्हायरल झाले होते. व्हिडीओज मधून तिने, कुठला डॉन आणि कुठला कोण? माझ्या नादी लागाल तर करील 302, सदर व्हिडिओमध्ये 302 म्हणजे खून केल्यानंतर लावले जाणारे कलम असून माझ्या नादाला लागाल तर खून केला जाईल, अशा भाषेत ही थेरगाव क्वीन लोकांना धमक्या द्यायची.
सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर हातात बंदूक घेऊन किंवा हत्यारे घेऊन धमकी देण्याचे तरुणांचे व्हिडिओ या पूर्वी देखील समोर आलेले आहेत. थेरगाव क्वीन म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झालेली साक्षी श्रीश्रीमल हिच्या वर पोलिसांनी कारवाई केल्यामुळे आता शहरात भाईगिरी करत व्हिडीओज काढणाऱ्या काही मंडळींना चाप बसेल यात काही शंका नाही.