Budget 2022 : काय स्वस्त, काय महागणार? एका क्लिकवर…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ फेब्रुवारी । मोदी सरकारने आर्थिक वर्ष २०२२ चा अर्थसंकल्प सादर केला. यात अनेक घोषणा करण्यात आल्या. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना या अर्थसंकल्पानंतर त्यांच्या खिशावरील आर्थिक ताण किती कमी होणार आणि किती वाढणार हाच प्रश्न आहे. त्यामुळेच केंद्रीय अर्थसंकल्पानंतर देशात कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तू महाग होणार याचाच हा आढावा.

काय महाग होणार?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना कस्टम ड्युटी वाढवण्याचं सुतोवाच केलं. त्यामुळे आता बाहेर देशातून आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. यात खालील गोष्टींचा समावेश आहे.

१. छत्री
२. हेडफोन
३. इअरफोन
४. लाऊडस्पिकर
५. स्मार्ट मीटर
६. सोलर सेल
७. सोलर मॉड्युल
८. एक्स रे मशिन
९. इलेक्ट्रिक खेळण्याचे भाग

काय स्वस्त होणार?
१. कापड
२. चमड्याच्या वस्तू
३. मोबाइल
४. फोन चार्जर
५. चप्पल
६. हिऱ्यांचे दागिने
७. शेतीची साधनं
८. गोठलेले शिंपले
९. हिंग
१०. कोको बिन्स
११. मिथाइल अल्कोहोल
१२. व्हिनिगरचे आम्ल (Acetic Acid)
१३. पेट्रोलियम उत्पादनांसाठी आवश्यक केमिकल
१४. मोबाईल फोनच्या कॅमेरा लेन्स
१५. स्टिल स्क्रॅब

अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा कोणत्या?
कॉर्पोरेट टॅक्स १८ टक्क्यांवरुन १५ टक्क्यांवर
त्यावर लागणारा सरचार्जही कमी करण्यात आला असून १२ टक्क्यांवरुन ७ टक्क्यांवर आणला
कॉर्पोरेट टॅक्सची मर्यादा १० कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे
इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये चूक झाल्यास सुधारण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी मिळेल
पेंशमध्ये करावर सवलत –
क्रिप्टो करन्सीवर होणाऱ्या कमाईवर ३० टक्के कर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *