महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. चीनच्या वुहान मधून पसरलेला हा व्हायरस हिंदुस्थानमध्येही पसरला आहे. देशातील रुग्णांची संख्या 300 पार गेली आहे. त्यामुळे भीतीदायक वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आधी केलेल्या आवाहनाला जनतेने चांगला प्रतिसाद देत 22 मार्च रोजी जनता कर्फ्यु पाळला. मात्र त्यानंतर काही ठिकाणी परत सरकारी नियम लोक पाळत नसल्याचे समोर आले. यानंतर कोरोनाबाबत पुढील रणनीती ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आज मंगळवारी रात्री 8 वाजता पुन्हा संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून एक ट्विट करण्यात आले. पंतप्रधान मोदी मंगळवारी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करतील, असे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.