महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ फेब्रुवारी । प्रेक्षक बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात होते. नुकतीच एक पोस्ट या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी शेअर केली आहे. नागराज यांनी या पोस्टमध्ये झुंड चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 4 मार्च 2022 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
Jhund coming to meet you in theatres on 4th March 2022!@SrBachchan @Nagrajmanjule #BhushanKumar #KrishanKumar #RaajHiremath #SavitaRajHiremath #GargeeKulkarni #MeenuAroraa @AjayAtulOnline @TSeries @tandavfilms @aatpaat @ZeeStudios_ pic.twitter.com/bmRycL1ZP1
— Nagraj Popatrao Manjule (@Nagrajmanjule) February 2, 2022
हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित आहे. सभोवतालीच्या गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांना तयार करून त्यांनी आपला फुटबॉल संघ बनवला होता. याच एकंदर कथानकावर ‘झुंड’ हा चित्रपट आधारित असणार आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी 18 जून रोजी रिलीज होणार होता, पण नंतर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.