Ramesh Deo : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव अनंतात विलीन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ फेब्रुवारी । ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचे काल (बुधवारी) निधन झाले. विलेपार्ले पूर्व परिसरातील पारसी वाडा येथील अंत्यसंस्कार पार पडले. रमेश देव यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo), मुलगा अजिंक्य देव (Ajinkya Deo), अभिनय देव (Abhinay Deo), सुना, नातवंडे असा परिवार आहे. रमेश देव यांनी मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

रमेश देव यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 1950 मध्ये केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी 285 हिंदी सिनेमे, 190 मराठी सिनेमे आणि 30 मराठी नाटकांत काम केले आहे. ‘आनंद’, ‘घराना’, ‘सोने पे सुहागा’, ‘गोरा’, ‘मिस्टर इंडिया’, ‘कुदरत का कानून’, ‘दिलजला’, ‘शेर शिवाजी’, ‘प्यार किया है प्यार करेंगे’ या चित्रपटांमध्ये रमेश देव यांनी काम केले. तसेच त्यांच्या आंधळा मागतो एक डोळा,भिंगरी, एक धागा सुखाचा, जगाच्या पाठीवर, यंदा कर्तव्य आहे या मराठी चित्रपटांमधील अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

रमेश आणि सीमा यांचं 1963 मध्ये लग्न झाल्यानंतर रमेश यांच्या निधनापर्यंत दोघांनीही 59 वर्षे सुखी संसार केला. या दोघानांही दोन मुलं असून यातील एक म्हणजे अजिंक्य देव आणि एक अभिनय देव. अजिंक्य हे एक प्रसिद्ध नट असून हिंदी, मराठी चित्रपटांसह सिरीयलमध्येही त्यांनी अनेक भूमिका साकरल्या आहेत. तर अभिनय हा दिग्दर्शक असून तो कथा-पटकथा देखील लिहितो. प्रसिद्ध सिनेमा दिल्ली-बेल्लीचं दिग्दर्शन त्यानेच केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *