सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं परीक्षांच वेळापत्रक केलं जाहीर, ऑनलाईन पद्धतीनेच होणार परिक्षा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ फेब्रुवारी । कोरोनाच्या काळात ऑनलाईन परीक्षा झाल्या होत्या, त्यामुळे यंदाच्या वर्षी परिक्षा कशा होणार याकडे पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Savitribai Phule Pune University) परीक्षा ऑनलाईन (online exam) पध्दतीने घेतल्या जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. विशेष म्हणजे येत्या 15 फेब्रुवारीपासून परीक्षांना सुरूवात होणार असून ऑनलाईन परीक्षा होणार आहेत. अहमदनगर, नाशिक आणि पुणे (Pune)जिल्ह्यातील साधारण 6 लाख विद्यार्थी परिक्षा देतील अशी माहिती मिळतं आहे. गेल्यावर्षी विद्यापीठाने इतर कंपनीकडून ऑनलाईन परीक्षा घेतली होती. परंतु यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्वत:च्या कंपनीमार्फत ऑनलाईन परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला वेळापत्रक पाहायला मिळेल.

कोरोनाच्या काळात मागच्या दोन वर्षात शाळा कॉलेज सुरू आणि बंद झाल्याचे आपण पाहत आहोत. त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणात असल्याने केंद्र शासनाच्या आदेशानुसार शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे देशातल्या अनेक विद्यापीठांनी आणि शाळांनी सुध्दा परीक्षा ऑनलाईन घेतल्या होत्या. सध्या देशात तिस-या लाटेचं सावट असताना परीक्षा कशा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु सावित्रीबाई फुले विद्यापिठाने ऑनलाईन परीक्षा होणार असल्याचं जाहीर केल्याने पालकांची आणि विद्यार्थ्यांची चिंता कमी होईल.

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या गेल्या वर्षी ऑनलाईन परीक्षा झाल्या होत्या, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत अनेक परीक्षा विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून ऑनलाईन पध्दतीने घेतल्या होत्या. तसेच यंदाच्या होणा-या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. अहमदनगर, नाशिक आणि पुणे विभागातील जवळपास 6 लाख विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देतील असं सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलं आहे. गेल्यावर्षी ऑनलाईन परिक्षेचं काम एका खासगी कंपनीला देण्यात आलं होतं. परंतु त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम सावित्रीबाई फुले विद्यापीठ स्वत:च्या कंपनीकडून करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *