Paytm Offer ! मोफत LPG Cylinder मिळवण्याची संधी, पाहा काय आहे प्रोसेस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ फेब्रुवारी । पेटीएमने (Paytm) आपल्या युजर्ससाठी एलपीजी सिलेंडर (LPG Gas Cylinder) बुकिंगवर एक जबरदस्त डील ऑफर केली आहे. पेटीएमकडून वेगवेगळ्या ऑफर्स (Paytm Offers) दिल्या जातात. एका ऑफरअंतर्गत तुम्ही 25 रुपयांची सूट मिळवू शकता तर दुसऱ्या ऑफरमध्ये 30 रुपये पेटीएम कॅशबॅक मिळवू शकता. त्याशिवाय आणखी एक तिसरी ऑफर आहे. यात तुम्ही मोफत घरगुती सिलेंडर मिळवू शकता, म्हणजेच या ऑफरमध्ये एकही रुपया न देता सिलेंडर (Free LPG Cylinder) मिळवता येईल.

महत्त्वाची बाब म्हणजे पेटीएमवरुन गॅस सिलेंडर बुक करताना या ऑफर्स मिळवण्यासाठी तुम्ही पहिल्यांदाच पेटीएमवरुन सिलेंडर बुक करणं गरजेचं आहे. याआधी पेटीएमवरुन एलपीजी सिलेंडर बुक केला असेल, तर ही ऑफर मिळणार नाही. पेटीएम युजर्सला सिलेंडर बुकिंगसाठी तीन ऑप्शन मिळतील. जर तुम्ही 25 रुपयांची सूट मिळवू इच्छित असाल, तर ही सूट लगेच मिळेल. 30 रुपये कॅशबॅक ऑफर मिळवायची असल्यास पेटीएम कॅश मिळेल. यासाठी प्रोमोकोड दिले गेले आहेत, ते बुकिंगवेळी अप्लाय करावे लागतील.

मोफत गॅस सिलेंडर (Free LPG Cylinder) मिळवण्यासाठी बुकिंगवेळी FREECYLINDER प्रोमोकोडचा वापर करावा लागेल. बुकिंगवेळी तुमच्या सिलेंडरचं संपूर्ण पेमेंट करावं लागेल. त्यानंतर पेटीएमच्या प्रत्येक 100व्या गॅस सिलेंडर बुक करणाऱ्या ग्राहकाला हा कॅशबॅक (100% Cashback) मिळेल. अधिकाधिक 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाईल. ही ऑफर 28 फेब्रुवारीपर्यंतच आहे. जर तुम्ही 100 वे लकी ग्राहक ठरलात, तर 24 तासांच्या आत कॅशबॅक मिळेल.

पेटीएमवर असा बुक करा गॅस सिलेंडर –

तुम्ही Indane, HP Gas, आणि BharatGas पैकी कोणत्याही कंपनीच्या सिलेंडरचं बुकिंग करू शकता. Book My Cylinder वर टॅप करा, इथे मोबाइल नंबर किंवा LPG ID किंवा कस्टमर नंबर टाका. त्यानंतर तुमच्या एजेन्सीबाबत माहिती मिळेल. त्यानंतर पेमेंट करू शकता. पेमेंटसाठी पेटीएम वॉलेट, पेटीएम युपीआय, कार्ड आणि नेट बँकिंगचे पर्याय असतील. एकदा बुकिंग झाल्यानंतर तुम्ही दिलेल्या पत्त्यावर सिलेंडर पाठवला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *