Gold Price ‘या’ कारणांमुळे सोनं महागणार ; जाणून घ्या काय आहे जाणकारांचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ६ फेब्रुवारी । महागाई नियंत्रणासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हसह प्रमुख केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. परिणामी जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १८०० डॉलरवर गेला आहे. नजीकच्या काळात व्याजदर वाढले तर सोन पुन्हा १८५० ते १९०० डॉलरपर्यंत वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परिणामी भारतात देखील सोन ५० ते ५२ हजार रुपयांपर्यंत वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कमॉडीटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव ९३ डॉलर प्रती बॅरल इतका वाढला आहे. सोन्याचा भाव देखील वाढत आहे. फेडरल रिझर्व्हने मागील बैठकीत व्याजदर वाढण्याचे संकेत दिले आहेत. त्याशिवाय बँक ऑफ इंग्लडकडून देखील लवकरच पाव टक्क्याची व्याजदर वाढ केली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थिती सोन्याला नवी झळाळी मिळण्याची शक्यता कमॉडिटी विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी बाजार बंद होताना १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७९४८ रुपये इतका होता. त्यात ३१ रुपयांची वाढ झाली. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४७७०२ रुपये इतका खाली आला होता. एक किलो चांदीचा भाव ६०८५२ रुपये इतका आहे. चांदीमध्ये १२० रुपयांची वाढ झाली. गेल्या दोन आठवड्यात सोने आणि चांदीला नफावसुलीचा फटका बसला होता. सोने जवळपास ७०० रुपयांनी तर चांदीमध्ये एक हजारांची घसरण झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *