पुण्यातील रस्त्यांवर पुन्हा धावणार डबलडेकर बस?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ६ फेब्रुवारी । पुण्यात तब्बल २० वर्षांनंतर डबलडेकर बस पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ही वाहने सोडण्याचा विचार पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) करत आहे, परंतु याबद्दलची चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे.पीएमपीएमएलने सांगितले की, एका कंपनीच्या प्रतिनिधींनी गेल्या महिन्यात येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेसबद्दल विचारले आणि ही सेवा का बंद करण्यात आली हे जाणून घ्यायचे होते. याबाबत आणखी चर्चा होणार आहेत.

यासंदर्भात इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालिका चेतना केकुरे यांनी सांगितले की, नवीन वाहने घेण्याचा विचार अधिकारी करत आहेत. या बसेस नेहमीच्या बसपेक्षा जास्त आसनक्षमता देतात. बहुतांश बस या इलेक्ट्रिक असल्यामुळे पर्यावरणाचे कमी नुकसान होणार आहे.

पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, या प्रकल्पात मुख्यमंत्र्यांना विशेष रस असल्यामुळे पीएमपीएमएल देखील यावर गांभीर्याने विचार करत आहे. परंतु डबल डेकर बस चालवणे सोपे नाही. मार्गांसह अनेक गोष्टी निश्चित करणे आवश्यक आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *