आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली, कोल्हापूरला शासकीय रुग्णालयात त्यांची तपासणी करणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ६ फेब्रुवारी । भाजपचे आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना काही वेळात कोल्हापूरला नेले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांची तपासणी केली जणार आहे. आज नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यांना पुन्हा न्यायालयनी कोठडी मिळणार की जामीन याचीही उत्सुकता आहे. (MLA Nitesh Rane’s chest hurts, he will be shifted to Kolhapur)

नितेश राणे यांच्या छातीत दुखत असल्याची माहिती देण्यात आली. काल रात्री नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर कणकवलीत आणण्यात आले होते. कणकवलीहून ओरोस जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. रक्तदाब वाढल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयात कार्डियाक सिस्टीम उपलब्ध नसल्याने कोल्हापूरमध्ये नेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. यानंतरच उपचार करण्यात येणार आहेत. सिंधुदुर्गातून थोड्याच वेळात 108 रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात नेले जाणार आहे. पडवे मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. आर एस कुलकर्णी आणि डॉ. मिलिंद कुलकर्णी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांच्याशी त्यांची चर्चा सुरु आहेत. जिल्हा रुग्णालयातील हालचाली वाढल्याचे दिसून येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *