महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ६ फेब्रुवारी । गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar health update) यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
लता मंगेशकर यांना काही दिवसांआधी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झालाय. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. लता मंगेशकर यांचं सध्या वय 92 वर्ष आहे. त्यांचं वय पाहता त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सगळीकडे प्रार्थना केल्या जात आहेत.
डॉक्टर काय म्हणाले?
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा ढासळली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्या व्हेंटिलेटरवर आहे. तसंच अजूनही आयसीयूमध्ये असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ प्रतित समदानी यांनी दिली आहे.