Indian Railways : रेल्वेच्या मोठ्या प्रमाणात प्रवासी, मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ६ फेब्रुवारी । तुम्ही आज म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी ट्रेनने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने 442 गाड्या रद्द केल्या आहेत. देशभरातील रेल्वेच्या वेगवेगळ्या झोनमध्ये सुरू असलेली दुरुस्ती आणि इतर कारणांमुळे भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जर आत तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल, तर तुम्ही आज अडचणीत येऊ शकता.

रद्द केलेल्या गाड्यांची यादी रेल्वेच्या नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम (NTES) च्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवासी, मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वेने सल्ला दिला आहे की, घर सोडण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ट्रेनची स्थिती तपासली पाहिजे. त्यानंतरच तुम्ही घर सोडा कारण यामुळे तुमची गैरसोय होणार नाही.

तसेच रेल्वेने ट्रेन रद्द झालेल्या लोकांना हे देखील आश्वासन दिलं आहे की, त्यांचे पैसे त्यांना रेल्वेकडून परत केले जातील. रेल्वेने रद्द केलेल्या गाड्यांची माहिती विविध स्थानकांवर उद्घोषणांद्वारे प्रवाशांना दिली जात आहे. तुम्ही कस्टमर केअर नंबर 139 द्वारे देखील ट्रेनची स्थिती तपासू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *