Jio Network: जिओचं नेटवर्क गायब; मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ६ फेब्रुवारी । देशातील आघाडीची मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणारी कंपनी असलेल्या Jio चे नेटवर्क डाऊन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील जिओची मोबाईल आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. दुपारी साधारण सव्वाबाराच्या सुमारास जिओचे नेटवर्क डाऊन व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर ट्विटरसह सोशल मीडियावर जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याचे मेसेजेस पडत आहेत. हा बिघाड नेमका कशामुळे झाला आहे, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. तसेच Reliance jio कडूनही यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (Jio network down in Mumbai & Thane region)

तब्बल तासभर उलटूनही जिओची सेवा पूर्ववत झालेली नाही. मात्र, कंपनीकडून हा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकर जिओची मुंबई आणि उपनगरातील सेवा पूर्वपदावर येईल, असा अंदाज आहे.

शहरातील उड्डाणपुलांवरील मोबाइल नेटवर्क टॉवरविषयीच्या करारास मुदतवाढ देण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नकार दिला आहे. करार संपल्याने पुलावरील टॉवर हटवून संबंधित साहित्य जप्त करण्याची कारवाई एमएसआरडीसीकडून सुरू आहे. या कारवाईमुळे कॉल ड्रॉप, कॉल न लागणे, आवाज अस्पष्ट येणे, मोबाइल नेटवर्क नसणे, इंटरनेट वेग कमी होणे असा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *