विद्यार्थी आंदोलन : Vikas Pathak ‘हिंदुस्थानी भाऊ’च्या पोलीस कोठडीत १४ दिवसांची वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ फेब्रुवारी । दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी सोमवारी म्हणजेच ३१ जानेवारी २०२२ रोजी मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी केलेल्या हिंसक निदर्शनांच्या प्रकरणामध्ये हिंदुस्तानी भाऊला चार फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, त्याच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकने या विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. मुंबईतील धारावी भागात हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ आला आणि त्याच्या समर्थनासाठी विद्यार्थी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले आणि पाहतापाहता हिंसक झाले होते, त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जदेखील केला होता.

विकास फाटक उर्फ ‘हिंदुस्थानी भाऊ’ याला आज वांद्रे येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. यावेळी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ऑफलाइन बोर्ड परीक्षांना विरोध करण्यासाठी इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी त्याला १ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हिंदुस्थानी भाऊने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही व्हिडीओ अपलोड केले होते. यामध्ये त्याने विद्यार्थ्यांना आंदोलनास प्रवृत्त केलं होतं. याच गुन्ह्याखाली त्याला मंगळवारी सकाळी धारावी पोलिसांनी अटक केली होती.

या आंदोलनामुळे सार्वजनिक संपत्तीचं नुकसान झाल्याबद्दल हिंदुस्थानी भाऊ आणि त्यांच्या वतीने आपणविना अट न्यायालयात माफी मागितली मागतल्याची माहिती हिंदुस्थानी भाऊचे वकील महेश मुळ्ये यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *