“महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका” ; सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीवर फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ फेब्रुवारी । भाजपा नेते किरीट सोमय्या यांना आज पुण्यात महापालिकेच्या आवारात शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली. या दरम्यना सोमय्या हे पायऱ्यांवर पडल्याने त्यांना दुखापतही झाल्याचे समोर आले आहे. या घटनेवर आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच, फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा देखील दिला आहे.

“राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही! महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध!” असं देवेंद्र फडणवीस ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *