महाराष्ट्र २४- ऑनलाईन – ; मुंबई : महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे १०७ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 15 जण हे कोरोनामुक्त झाल्याचं तपासणीतून स्पष्ट झालं आहे. त्यांना लवकरच घरी पाठवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे. टोपे यांनी मंगळवारी ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाग्रस्तांची स्थिती त्याचबरोबर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचीही त्यांनी माहिती दिली.
गुढीपाडव्याच्या सणानिमित्त जनतेला शुभेच्छा देतानाच नववर्षांची सुरूवात करोनावर मात करण्याच्या दृढ निश्चयाने करा, या विषाणूवर विजय मिळविण्याचा संकल्प करा, असे आवाहन टोपे यांनी केले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक खोटे मेसेजही सोशल मीडियावर फिरत आहेत. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबई पोलिसांनी वेळा घालून दिल्या आहेत अशी पोस्ट मुंबई पोलिसांच्या नावाने व्हायरल होत आहे.
मात्र हा मेसेज फेक असल्यानं कृपा करुन ती व्हायरल करु नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.
https://twitter.com/CPMumbaiPolice?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1242295066313363456&ref_url=https%3A%2F%2Fwww.bbc.com%2Fmarathi%2Findia-52030030