महाराष्ट्र २४- ऑनलाईन – ; मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ३१ मार्चपर्यंत सगळीकडे ‘लॉकडाऊन’ करण्यात आलं आहे. अशावेळी राजकारण्यांपासून ते अगदी सामान्यांपर्यंत सगळ्यांनाच घरी राहण्याचे सक्तीचे आदेश देण्यात आले. अशावेळी राजकारणी मंडळी या संधीचा फायदा घेत आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.
शरद पवार मुलगी सुप्रिया सुळे आणि नात यांच्यासोबत बुद्धीबळाचा डाव खेळताना दिसत आहेत. याचा व्हिडिओ सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ राजकारणापलिकडचे पवार-सुळे कुटुंबिय दाखवत आहेत.
बाबांसोबत बुद्धीबळाचा डाव खेळणं सोपं नसतं. #CoronavirusLockdown मुळे आम्ही सर्वजण घरात आहोत.आम्ही दुपारी बुद्धिबळाचा डाव मांडला.थोड्या वेळातच बाबांनी आम्हा मायलेकींना हरवलं.आम्ही पुस्तकं वाचतोय,कुटुंबासोबत वेळ घालवतोय.तुम्हीही घरीच असा, सुरक्षित राहा. – Sharad Pawar
Posted by Supriya Sule on Tuesday, March 24, 2020
बुद्धीबळ हा खेळ तसा सहज खेळता येणारा खेळ नाही. या खेळाला एक प्रकारची हुशारी आवश्यक असते.सुप्रिया सुळेंच्या या व्हिडिओत शरद पवार त्यांना सहज हरवताना दिसत आहेत