महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . 6 फेब्रुवारी । गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला.
# दयाळू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या – पंतप्रधान मोदी
# जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले- शरद पवार
# स्वर युगाचा अंत झाला, मातृतुल्य आशीर्वाद हरपला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
# “त्यांच्या स्वरात ईश्वराला जागवण्याची व तान्हुल्यांना निजवण्याची जादू होती” : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
# महाराष्ट्रकन्येच्या निधनानं देशाची हानी, लतादिदींची उणीव भरुन निघणं अशक्य : -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
# लतादीदींच्या निधनानं संगीत क्षेत्रासह देशाचं मोठं नुकसान- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
# दीदींनी अजरामर केलेला संगीताचा अनमोल ठेवा माझ्यासह कोट्यावधी रसिकांच्या सदैव स्मरणात राहील- धनंजय मुंडे
# संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळल्याची भावना-जयंत पाटील
# लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला : देवेंद्र फडणवीस
# लतादीदींच्या आवाजाने जगभरातील लाखो लोकांना आनंद दिला – विरेंद्र सहवाग