महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . 6 फेब्रुवारी । ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न 92 वर्षीय लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त येत असताना संजय राऊत यांनी दोन शब्दाचं ट्विट केलं आहे. या ट्विट मध्ये त्यांनी युग संपले… असं म्हटलं आहे.
युग संपले… pic.twitter.com/prMUOK74oW
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 6, 2022
महान गायिका लता मंगशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला. सहस्त्रकातून एखाद्या कलाकाराला लाभतो असा आवाज, असा मान या गानसम्राज्ञीला मिळाला होता.
एक सूर्य
एक चंद्र…
एकच लता… pic.twitter.com/kRPOpeaZQP— Sanjay Raut (@rautsanjay61) February 6, 2022
लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. अगदी काही दिवसांपूर्वी त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी बातमी आली होती. त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही काढला होता. पण शनिवारी (5 फेब्रुवारी) त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. डॉ. प्रतीत सामदानी यांची टीम त्यांच्यावर ICU मध्ये उपचार करत होती.