लतादीदींच्या सुरांनी अजरामर झालं ‘ऐ मेरे वतन के लोगो…; गाणं ऐकून पंडित नेहरुही झाले होते भावूक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ फेब्रुवारी । गेल्या आठ दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झाला आहे. तरुणांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत सर्वांना लतादीदींच्या आवाजाची मोहिनी घातली आहे. लतादीदींची सर्वच गाणी अजरामर झाली आहेत. ऐ मेरे वतन के लोगो हे गाणं आजही लाखो रसिकांच्या हृदयाला स्पर्शून जाते. हे गाणं ऐकताना आपसूकच डोळ्यातून पाणी येते. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना सुद्धा अश्रू रोखता आले नाही.

१९६२ ला चीनसोबत झालेल्या युद्धात भारत भारताचा पराभव झाला होता. या युद्धात हजारो भारतीय सैनिक शहीद झाले होते. तर, कितीतरी सैनिक बेपत्ता झाले होते. या युद्धानंतर भारतावर दुखाःचे सावट पसरले होते. सैनिकांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन दिलीप कुमार करत होते. तर, लतादीदींना कवी प्रदीप यांनी लिहलेले गीत ऐ मेरे वतन के लोगों हे गाणं गायचं होतं. रामचंद्र के ऑर्केस्ट्रावर सुरू असलेल्या या गाण्याने तिथे उपस्थित असलेल्या रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर वाहिला. माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांनाही आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. गाणं सुरू असतानाच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अश्रूंचा बांध फुटला. लतादीदींचा सुद्धा गाणं संपता संपता कंठ दाटून आला होता.

कार्यक्रम संपल्यानंतर जवाहरलाल नेहरु यांनी कवी प्रदीप यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आयोजकांनी प्रदीप यांना आमंत्रणच दिलं नव्हतं. ही गोष्ट समजताच नेहरु नाराज झाले होते. दिल्लीतील कार्यक्रम संपल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरु एकदा मुंबईला आले होते. तेव्हा स्वतः नेहरु यांनी प्रदीप यांची भेट घेत त्यांचं कौतुक केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *