BSF ची मोठी कारवाई, पाकिस्तानी घुसखोऱ्यांना केलं ठार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ फेब्रुवारी । सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानची (Pakistan) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये शनिवारी रात्री पाकिस्तानचे 3 घुसखोर भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान, तेथे तैनात असलेल्या BSF च्या जवानांनी तिघांनाही ठार केलं. यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे. त्यांच्याकडून बीएसएफने 180 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.

त्यांच्याकडून बीएसएफने 36 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. BSF नं दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफच्या जवानांनी तस्करीचा प्रयत्न करणाऱ्या तीन ड्रग्ज तस्करांना ठार केलं आहे. त्यांच्याकडून हेरॉईनची 36 पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत सुमारे 180 कोटी आहे.

BSF च्या म्हणण्यानुसार, 6 फेब्रुवारीच्या पहाटे बीएसएफ जवानांना सांबामध्ये तस्करांकडून ड्रग्जची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर बीएसएफने तीन पाकिस्तानी तस्करांना ठार केलं. त्यांच्याकडून 36 पाकिटे, सुमारे 36 किलो ड्रग्ज सापडले आहेत. हे ड्रग्ज हेरॉईन असू शकतात. परिसरात शोध सुरू आहे.

शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीवर कारवाई करत, सुरक्षा दलांनी रात्री शहराच्या जाकुरा भागात घेरावबंदी आणि शोध मोहीम सुरू केली, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

त्यांनी सांगितलं होतं की, जेव्हा सुरक्षा दल परिसरात शोध मोहीम राबवत होते, तेव्हाच तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिल्याचं ते म्हणाले. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून घटनास्थळावरून त्यांचे मृतदेह सापडले.

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. जानेवारी महिन्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये 11 चकमकी झाल्या आहेत. यामध्ये 21 दहशतवादी ठार झाले आहेत. गेल्या 2 महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये 9 पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *