महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ फेब्रुवारी । पेट्रोल-डिझेल (petrol and diesel) दरवाढ असो किंवा घरगुती किंवा व्यावसायिक गॅस सिलेंडर यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसताना आपण सर्वांनी बघितले. मात्र आता व्यावसायिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. व्यावसायिक सिलेंडर 91 रुपयांनी कमी केलाय. याआधीही जानेवारी महिन्याच्या सुरवातीलाच व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये शंभर रुपयांची कपात करण्यात आली होती.
फेब्रुवारीच्या सुरुवातीला पेट्रोलियम कंपन्यांनी (Petroleum Company) व्यावसायिक ग्राहकांना सुखद धक्का दिलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजी (LPG)चे दर घसरल्याने व्यावसायिक ग्राहकांना याचा फायदा देणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे देशात व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. मात्र घरघुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत काहीत बदल करण्यात आला नाही त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सुर आहे.