Nitesh Rane: नितेश राणे यांच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण, उद्या 11 वाजता निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ फेब्रुवारी । भाजप आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मागील काही दिवसांपासून अडचणीत आहेत. नितेश राणे यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या नियमित जामिनासाठी सिंधुदुर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत उद्या 11 वाजता निर्णय सुनावणार असल्याचं जाहीर केलं.

जिल्हा सत्र न्यायाधीश रोटे यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आमदार नितेश राणे हे शरण आल्यानंतर कस्टडी मध्ये घेतलं नाही, अशी तक्रार करत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आमदार नितेश राणे यांची सुनावणी सिंधुदुर्ग सत्र न्यायाधीश रोटे यांच्या समोर न करण्याचा अर्ज न्यायालयात दिला होता. तर राणेंचे वकील सतीश माने शिंदे यांनी व्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज केला तेव्हापासून सरकारी वकील विविध गोष्टीतून वेळकाढूपणा करत असल्याचं सांगत, दुसऱ्या व्यायालयासमोर सुनावणी घेण्यासाठी केलेला अर्ज बरखास्त करा अशी मागणी केली होती. दरम्यान दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकून घेत हा अर्ज न्यायालयाने रद्द केला. तर दुसरीकडे जामिन अर्जावरील दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपल्यानंतर निर्णय उद्या 11 वाजता सुनावण्यात येणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • More Networks
Copy link