‘कोण होणार करोडपती’ चं नवं पर्व लवकरच तुमच्या भेटीला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० फेब्रुवारी । महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आणि ज्ञान-मनोरंजन यांचा अनोखा मिलाप असलेला ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं नवं मराठी पर्व सोनी मराठी वाहिनीवर लवकरच येतंय. येत्या 23 फेब्रुवारी ते 8 मार्च यादरम्यान ‘कोण होणार करोडपती’ या खेळात सहभागी होण्यासाठीचे प्रश्न सुरू होतील.

सोनी मराठी वाहिनीवरला ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरांत पोचला आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत. गेल्या पर्वामध्ये सचिन खेडेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना आपलंस करून घेतलं होतं. सचिन खेडेकर मराठी घराघरांत सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. आपली देहबोली आणि आपला आवाज यांमुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *