कोरोना व्हायरस ; चीन आणि अमेरिकेमध्ये युद्ध छेडलं गेलं

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन; मुंबई – कोरोना व्हायरसच्या जागतिक प्रकोपादरम्यान चीन आणि अमेरिकेमध्ये एक युद्ध छेडलं गेलं आहे आणि दोन्ही देशांचं बरंच काही पणाला लागलं आहे. चीनला जागतिक नेता व्हायचंय तर अमेरिकेच्या हातातून ‘जगाचे पोलीस’ ही भूमिका निसटताना दिसून येतेय. खरंतर अख्ख्या जगासाठीच हा चांगला काळ नाहीये. त्यात चीन आणि अमेरिकेचे आपसातले संबंधही चांगले नाहीयेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप वारंवार कोरोना व्हायरसला ‘चीनी व्हायरस’ म्हणत आहेत तर आक्रमक शैली असणारे त्यांचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ याला ‘वुहान व्हायरस’ म्हणत आहेत. अमेरिकेच्या अशा नाव ठेवण्याने साहजिकच चीन उखडला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री दोघांनीही कोरोना व्हायरसच्या सुरुवातीलाच त्यावर नियंत्रण न मिळवू शकल्याने चीनवर टीका केली आहे. पण चीनच्या प्रवक्त्यांनी या सगळ्या आरोपांचं खंडन केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की या व्हायरससंदर्भात चीनने कोणतीही माहिती जगापासून लपवली नाही.

दुसरीकडे चीनच्या सोशल मीडियामध्ये अनेक सांगोवांगी गोष्टी फिरताहेत ज्यात म्हटलंय की हा रोग अमेरिकेच्या मिलीटरी जर्म वॉरफेअरमार्फत पसरवण्यात आला आहे. तर दुसरीकडे वैज्ञानिकांनी हेही दाखवून द्यायचा प्रयत्न केलाय की या व्हायरसची संरचना पूर्णपणे नैसर्गिक आहे. चीन आणि अमेरिकेदरम्यान छेडलं गेलेलं हे युद्ध फक्त आरोप-प्रत्यारोपांपुरतच मर्यादित नाहीये. आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टी या दरम्यान घडत आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेने घोषणा केली की ते इटली आणि इतर युरोपियन देशांच्या नागरिकांसाठी आपल्या देशाच्या सीमा बंद करत आहेत.त्याचवेळेस चीनच्या सरकारने घोषणा केली की ते इटलीमध्ये आपली मेडिकल टीम आणि इतर गोष्टी पाठवणार आहेत. इटलीत सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *