IND vs SL New Schedule: भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांच्या वेळापत्रकात बदल, बीसीसीआयची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १५ फेब्रुवारी । भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात पार पडणाऱ्या आगामी कसोटी आणि टी20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. आधी कसोटी मालिका आणि नंतर टी20 मालिका पार पडणार होती. पण आता नव्या बदलानुसार आधी टी20 आणि नंतर कसोटी मालिका पार पडेल. 24 फेब्रुवारीपासून टी20 तर 4 मार्चपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

याआधी 25 फेब्रुवारी रोजी पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार होती. 25 फेब्रुवारी ते 1 मार्च पहिली कसोटी, त्यानंतर 5 मार्च ते 9 मार्च दुसरी कसोटी खेळवली जाणार होती. ज्यानंतर 13 मार्च, 15 मार्च आणि 18 मार्च हे तीन दिवस पहिला, दुसरा आणि तिसरा टी20 सामना खेळवला जाणार होता. पण आता आधी टी20 मालिका पार पडणार असून नंतर कसोटी मालिका खेळवली जाईल.

असं असे नवं वेळापत्रक?

दिवस दिनांक सामना ठिकाण
गुरुवार   24      फेब्रुवारी पहिला टी20 सामना लखनौ
शनिवार 26       फेब्रुवारी दुसरा टी20 सामना धर्मशाला
रविवार  27       फेब्रुवारी तिसरा टी20 सामना धर्मशाला
शुक्रवार    4        मार्च ते 8 मार्च पहिला कसोटी सामना मोहाली
शनिवार 12         मार्च ते 16 मार्च दुसरा कसोटी सामना बंगळुरु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *