आज “या” राशींच्या लोकांच्या अडचणी दूर होणार :पहा आजचे राशीभविष्य

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ फेब्रुवारी ।

मेष:-
आज दिवस चांगला आहे. कलासक्त दृष्टीकोन वाढीस लागेल. मैत्रीचे नवीन संबंध जुळून येतील. आवडीचे पदार्थ खाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. आनंदी दृष्टीकोन बाळगाल.

वृषभ:-
आज दिवस मनाजोगा घालवाल. काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवाल. तुमची उत्तम छाप पडेल. जि‍भेवर साखर ठेवून बोलाल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.प्रवास होईल.

मिथुन:-
आज मानसिक चंचलता जाणवेल. मैत्रीचे संबंध घट्ट होतील. कामात स्त्रियांची मदत मिळेल. वागण्यात शालीनता दाखवाल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.आर्थिक फायदा देणारा दिवस.

कर्क:-
कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल. गोड बोलून कामे साध्य करता येतील. कलागुण उत्तमरीत्या प्रकट होतील. घराची सजावट कराल. व्यवसायात समाधानकारक वातावरण राहील.

सिंह:-
आज कामात स्थिरता ठेवावी. धार्मिक वृत्तीत वाढ संभवते. इतरांना आनंदाने मदत कराल. पित्तविकार बळावू शकतात. इतरांच्या विश्वासास पात्र व्हाल.व्यवसायात नवीन संधी मिळतील .

कन्या:-
आज दिवस कष्टदायक असेल . काही कामे कमी श्रमात पार पडतील. अचानक धनलाभ संभवतो. रेस, सोडत यातून लाभ संभवतो. बौद्धिक ताण राहील. आपलेच म्हणणे खरे कराल.

तूळ:-
आज वैवाहिक सौख्यात वाढ होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. शेअर्स मधून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधानी राहाल. कौटुंबिक बाबीत दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक:-
आज जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल. भागीदारीत खुश राहाल. संपर्कातील लोकांचा जिव्हाळा वाढेल. इतरांच्या मताचा आदर करावा. हट्टीपणा दूर सारावा लागेल.

धनू:-
आह खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. फार अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. तुमचे धाडस वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.प्रवास टाळावा .

मकर:-
आज मनातून निराशा दूर सारावी. अडथळ्यातून मार्ग काढावा. खर्चाचे योग्य नियोजन करावे. मुलांचा आनंद द्विगुणित होईल. उधारीचे व्यवहार सावधानतेने करावेत.

कुंभ:-
आज मैत्रीत कटुता येणार नाही याची काळजी घ्यावी. उगाच चिडचिड करू नका. आपली संगत एकवार तपासून पहावी. जवळचा प्रवास मजेत कराल. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल.

मीन:-
आज आवडत्या लोकांच्यात रमून जाल. बोलण्यात मधाळपणा जपाल. कामाच्या ठिकाणी संबंध जपाल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *