जगात थैमान घालणारा ‘कोरोना’, शास्त्रज्ञांनी पुण्याच्या लॅबमध्ये काढला फोटो

Spread the love

महाराष्ट्र २४-ऑनलाईन ; पुणे ; : कोरोनाने जगभर थैमान घातलं आहे. जगातले 150 पेक्षा जास्त देश त्याने ग्रासले आहेत. मात्र अजुनही त्यावर औषध सापडलेलं नाही. भारतातल्या जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. COVID 19 या कुटुंबातला असलेल्या या व्हायरचा फोटो मिळविण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आलं आलं. पुण्यातल्या प्रयोगशाळेतल्या शास्त्रज्ञांनी Transmission electron microscope imaging चा वापर कर त्या व्हायरसला कॅमेऱ्यात कैद केलं आहे. त्याबाबतची माहिती Indian Journal of Medical Research मध्ये प्रकाशीत झाल्याचं वृत्त Hindustan Timesने दिलं आहे.

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर 30 जानेवारीला वुहानमध्ये शिकणारे काही विद्यार्थी भारतात परतले होते. त्यांच्या घशातल्या द्रावांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी आले होते. भारतातली ती पहिलीच चाचणी होती. त्या तिघांचीही टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. त्या नमुन्यातून हे फोटो मिळविण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे.

कोरोनावर सध्या लस मिळालेली नाही. सर्व जगात त्यावर संशोधन सुरू आहे. भारतात एकवेम आणि विख्यात असलेल्या National Institute of Virology (NIV)मध्येही त्यावर संशोधन सुरु आहे. तिथल्या शास्त्रज्ञांना हे यश मिळालं असून पुढच्या संशोधनात त्याचा फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *