कोरोनाने वर्तणूक बदलली? भारतात 15 दिवसांनी दिसली लक्षणं

Spread the love

महाराष्ट्र २४-ऑनलाईन ; पंजाब : कुठल्याही नव्या विषाणूचा मानवी शरीरात तग धरून संसर्ग पसरवण्याचा एक पॅटर्न असतो. या पॅटर्नला छेद देणारी केस भारतात सापडली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.दुबईहून आल्यानंतर पंजाबमधल्या एका 22 वर्षीय तरुणाला घरातच विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला होता. त्याच्यामध्ये कुठलंही कोरोनाव्हायरसचं लक्षण दिसलं नाही, तरीही त्याने सरकारने दिलेला सल्ला मानून 14 दिवस स्वतःला घरात बंद केलं.

14 दिवसांच्या होम क्वारंटाइननंतर 15 व्या दिवशी त्याला ताप चढला. त्यानंतर त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आली.

चंदिगडमधल्या तरुणाच्या या विचित्र केसमुळे देशभरातल्या सगळ्याच वैद्यकीय तज्ज्ञांचं आणि आरोग्य सेवकांचं धाबं दणाणलं आहे. होम क्वारंटाइन किंवा संशयित रुग्णांना केवळ 14 दिवसच अलग ठेवण्यात येतं. त्या दिवसात लक्षणं दिसली नाहीत तर कोरोनाव्हायरसची लागण झाली नसल्याचं गृहित धरलं जातं. आता चंदिगडच्या या केसमुळे मात्र वेगळाच धोका निर्माण झाला आहे.

चंदिगडची जबाबदारी असलेले IAS अधिकारी मनोज परिदा यांनी यासंबंधी ट्वीट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *