Gold Price Today: सोने ५० हजारांच्या पार ! तर चांदी स्वस्त, जाणून घ्या दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २१ फेब्रुवारी । सोन्या चांदीच्या किमतीत गेल्या काही दिवसात चढउतार पाहायला मिळत आहे. करोना महामारी, महागाई, रशिया-युक्रेय यांच्या युद्धजन्य स्थिती याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होत आहे. सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सोन्याची किंमत ५० हजारांच्या पार गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात ०.०१ टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. तर चांदीच्या किंमतीत ०.३८ टक्क्यांची घट दिसून आली आहे. एप्रिल डिलिव्हरी असलेल्या सोन्याची किंमत ०.०१ टक्क्यांच्या तेजीसह ५०,११९ रुपये प्रति १० ग्राम आणि चांदीची किंमत ०.३८ टक्क्यांच्या घसरणीसह ६३,६५९ रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.

काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,९९० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,१८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,१४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,२४० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,९९० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,१८० रुपये इतका असेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *