महाराष्ट्र २४ – ऑनलाईन ; पुणे : चीनच्या मदतीशिवाय भारत तीन ते चार महिन्यांपर्यंत औषधांचे उत्पादन करण्यात सक्षम आहे. यामुळे किरकोळ बाजारात औषधींच्या किमती वाढण्याची भीती नाही. याची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले हे की भारतीय औषधी कंपन्यांकडे तीन ते चार महिन्यांपर्यंतचा पुरेशा प्रमाणात औषधी तयार करायचा साठा आहे. दुसरे हे की आता चीनमधून औषधी बनवण्याचा कच्चा माल समुद्र आणि हवाई मार्गे सुरू झाला आहे.
चीनमधून औषधी बनवण्यासाठीचा कच्चा माल येणे सुरू झाले आहे. हवाईमार्गे अधिक किमतीचे साहित्य येते. तसेच कंपन्यांकडे सध्या औषधी बनवण्यासाठी कमीत कमी तीन ते चार महिन्यांचा कच्चा माल उपलब्ध आहे. यामुळे औषधी बनवण्यासाठीच्या कच्च्या मालाची कमतरता नाही. तर, कोरोनामुळे औषधींच्या किमती वाढण्याची भीती नाही. औषधी तयार करण्याच्या कच्च्या मालाची किंमत कितीही जास्त झाली तरी वर्षात एकदाच औषधाची कमीत कमी किंमत वाढवण्याची परवानगी मिळते.