महाराष्ट्र २४ – ऑनलाईन ; पुणे : पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला असुन त्याकरिता उपाययोजना म्हणून आरोग्य विभागामार्फत अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार कोरोना बाधित व संशयित रुग्ण आढळून आलेल्या इमारतीमध्ये व त्या नजीकच्या परिसरात तसेच परदेशातून आलेल्या नागरिकांचे इमारतीमध्ये व आसपासच्या परिसरामध्ये सोडिअम हायपोक्लोराईट व बैक्टोडेक्सची फवारणी करण्यात येत आहे.तथापि, शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था खाजगी मंघटना तसेच अन्य घटकांमार्फत त्यांचे भागामध्ये व संपूर्ण शहरामध्ये औषध फवारणीची वारंवार मागणी करण्यात येत आहे. त्यानुसार आरोग्य विभाग व अग्निशामक विभाग यांच्यामार्फत संयुक्त मोहिम राबविण्यात येणार असून अग्निशामनविभागाच्या वाहनांद्वारे संपूर्ण शहरामध्ये बँक्टोडेक्स औषधाची फवारनी करण्यात येणार आहे. त्याकरिता एकूण ७ अग्निशामक वाहनाद्वारे रात्री १ ०.० ० ते स.६.०० या वेळेमध्ये पुढील ४ दिवस संपूर्ण शहरामध्ये औषधाची फवारणी करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, शहरामध्ये संपूर्ण लॉकडाऊन असल्याने कोणीही घराबाहेर पडू नये तसेच औषध फवारणीची कार्यवाही मध्ये व्यत्यय आणू नये ही विनंती.
(डी के अनिल रॉय)
आरोग्य वैद्यकीय अधिकारी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी – ४११ ०१८