पिंपरी-चिंचवड :मागच्या 8 दिवसांमध्ये एकही नवा कोरोनाचा रुग्ण आढळला नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन ; पुणे : पिंपरी चिंचवड : महाराष्ट्रात मुंबई-पुण्यात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्या 100 वर पोहोचली आहे. तर पुण्यातही कोरोनाचा धोका बाकी जिल्ह्यांपेक्षा अधिक आहेच. यातच एक दिलासा देणारी बातमी म्हणजे पिंपरी-चिंचवड परिसरात मागच्या 8 दिवसांमध्ये एकही नवा कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे तिथला नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. तिथल्या आणखी 5 नागरिकांनी कोरोनाचा लढा यशस्वी केला आहे. या पाचही जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरी पाठवलं आहे.

14 मार्च रोजी पिंपरीतील एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं होतं. थायलंडहून परत आलेला एक जण कोरोना बाधित होता ,या पाचही जणांवर पिंपरीतील भोसरी इथल्या रुग्णालयात 14 दिवस उपचार सुरू होते. त्यानंतर या सर्वांची दोन वेळा कोरोनाच्या टेस्ट केल्या आणि दोन्ही टेस्टचे अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे 5 ही रुग्ण कोरोना मुक्त झाल्याच स्पष्ट झालं आहे. या पाचही जणांना डिस्चार्ज दिल्याची माहिती पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील ह्यांनी दिली.

दरम्यान आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या पाचही जणांना पुढील 14 दिवस होम क्वारनटाइन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागच्या दोन दिवसांत शहरातील एकूण 12 कोरोनाग्रस्तांपैकी 5 जणांनी यशस्वी मात केली आहे. तर 8 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. त्यापैकी 4 जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व रुग्णांची आम्ही नियमित काळजी घेत होतो. हे सगळे रुग्ण पॉझिटीव्ह असतानाच त्यांना जास्त कोणतीही लक्षणं नव्हती. त्यामुळे त्यांना योग्यवेळी उपचार करण्यात आल्यामुळे लवकर बरे झाले आणि हा व्हायरस शरीरात पसरण्याचा धोका कमी झाला. त्यामुळे हे रुग्ण लवकर उपचाराला प्रतिसाद देऊ शकले आणि त्यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *