महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ फेब्रुवारी । राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर जल्लोषादरम्यान तलवार काढल्याप्रकरणी भाजपच्या मोहित कंबोज विरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शस्त्र कायद्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. जमीन खरेदी प्रकरणात ईडीने मंत्री नवाब मलिक याना आज अटक केली. अटक केल्यानंतर आज सायंकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कंबोज यांच्या सांताक्रूझ येथील राहत्या घराजवळ फटाके पह्डले. भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. घोषणाबाजीदरम्यानच पंबोज यांनी तलवार काढली. तलवारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्या विडिओची सांताक्रूझ पोलिसांनी दखल घेतली. शहरात शस्त्र कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी रात्री उशिरा पंबोज विरोधात गुन्हा दाखल केला.