अशी नखं असणारे लोकं असतात हुशार आणि नशिबवान , आकारावरुनच कळेल एखाद्याचा स्वभाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २५ फेब्रुवारी । आपल्या शरीराचे अवयव आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही व्यक्त करतात. रेषा आणि हाताच्या आकाराला आणि तळहातावरच्या रेषांना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. त्यावरून भाग्य कळतं, असं म्हटलं जातं. याशिवाय हाताच्या बोटांच्या नखांनाही विशेष महत्त्व आहे. नखं आपल्या बोटांच्या टोकांचे संरक्षण तर करतातच, शिवाय या नखांमध्ये आपलं भाग्यही दडलेलं असतं, असं म्हटलं जातं. प्रत्येक व्यक्तीच्या नखांचा आकार भिन्न असतो. कुणाची नखं चमकदार आणि लांब असतात, तर कुणाची नखं आखूड असतात. तसंच त्यांच्यावर हलक्या रेषाही असतात.

हात, बोटं, नखं यांचा पोत आणि रंगावरून एखाद्या व्यक्तीबद्दल जाणून घेता येतं. त्यावरून त्या व्यक्तीचं भविष्यदेखील कळू शकतं, असं म्हटलं जातं. नखांच्या आकारावरून माणसाचा स्वभावही ओळखला जातो. तो कोणत्या क्षेत्रात नाव कमावणार किंवा आपला ठसा उमटवणार हे कळू शकतं.

काही जणांची नखं बदामाच्या आकारासारखी असतात. अशी बदामाच्या आकाराची नखं असलेली माणसं खूप दयाळू असतात. सर्वांशी चांगलं वागतात. या व्यक्ती अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सदैव तत्पर असतात.

काही जणांची नखं तीक्ष्ण असतात. तीक्ष्ण नखं असलेल्या व्यक्ती खूप हट्टी आणि रागीट असतात. तीक्ष्ण नखांच्या व्यक्तींचं कुणाशीही लवकर भांडण होतं.

व्यक्तीगणिक नखांचा आकार बदलतो. काही जणांच्या नखांचा आकार चौकोनी असतो. चौकोनी आकार असलेल्या व्यक्ती स्वभावाने खूप गंभीर असतात. त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता असते. त्यांच्या नेतृत्वगुणामुळे त्यांना भरपूर यश मिळतं.

काही जणांची नखं लांब आणि रुंद असतात. लांब नखं असलेल्या व्यक्ती स्वभावाने साध्या, पण खूप सर्जनशील असतात. त्यांची कल्पनाशक्तीही खूपच चांगली असते. यासोबतच त्या कलेच्या क्षेत्रात चांगलं नाव कमावतात. रुंद नखं असलेल्या व्यक्ती अत्यंत हुशार असतात. रुंद नखं असलेल्या व्यक्तींमध्ये विचार करण्याची, समजून घेण्याची आणि विश्लेषण करण्याची क्षमता आश्चर्यकारक असते. आपल्या मेंदूचा ते अत्यंत योग्य वापर करतात आणि आपलं काम लवकर पूर्ण करतात.

अनेकांची नखं गोल किंवा अंडाकृती असतात. ज्यांची नखं गोल किंवा अंडाकृती असतात, त्या व्यक्ती कोणालाही सहजपणे प्रभावित करण्यात यशस्वी असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचं विलक्षण आकर्षण असतं. त्यामुळे ते लोकांना आपल्याकडे आकर्षून घेतात. या आधारे तुम्हीदेखील नखांच्या आकारावरून तुमचं किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींचं भाग्य जाणून घेऊ शकता.

(नोट : या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. याला शास्त्रीय आधार नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *