IND vs SL : ऋतुराज गायकवाड T20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी , माजी कोचचा दावा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २५ फेब्रुवारी । टीम इंडियानं गुरूवारी झालेल्या पहिल्या टी20 मध्ये श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) 62 रननं पराभव केला. भारतीय टीमनं दमदार कामगिरी करत विजय मिळवला असला तरी पुणेकर ऋतुराज गायकवाडसाठी (Ruturaj Gaikwad) ही मॅच निराशादायक ठरली. त्याला दुखापतीमुळे पहिली मॅच खेळता आली नाही. आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) ऑरेंज कॅप विजेत्या ऋतुराजला प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये या सीरिजमध्ये मोठी संधी होती. पहिल्या सामन्यात त्याला ती संधी साधता आली नाही.

ऋतुराजला टी20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियामध्ये संधी मिळणार नाही, असा दावा माजी बॅटींग कोच संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी केला आहे. ते ‘स्टार स्पोर्ट्स’ वरील कार्यक्रमात बोलत होते. ‘टीम इंडियाकडे रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul) आणि इशान किशन (Ishan Kishan) हे तीन ओपनर उपलब्ध आहेत.’ त्यामुळे माझ्या मते ऋतुराजला टी20 वर्ल्ड कपच्या टीममध्या जागा मिळणार नाही, असा दावा बांगर यांनी केला.

ऋतुराज जबरदस्त फॉर्मात

ऋतुराजसाठी 2021 हे वर्ष प्रचंड यशस्वी ठरलं. त्याने विजय हजारे स्पर्धेतील 5 इनिंगमध्ये 4 शतकांसह 603 रन केले होते. या स्पर्धेत त्याची सरासरी 151 तर स्ट्राईक रेट 113 होता. त्याचबरोबर आयपीएल 2021 मध्ये त्याने सर्वात जास्त 636 रन करत ऑरेंज कॅप पटकावली. तर सय्यद मुश्तार अली टी20 स्पर्धेत 150 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं 259 रन काढले. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याची टीम इंडियात निवड झाली.

टी20 वर्ल्ड कप ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. टीम इंडियाला 2007 नंतर टी20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाीही. तर 2013 नंतर एकही आयसीसी ट्रॉफी भारतीय टीमनं पटकावलेली नाही. संजय बांगरनं ऋतुराज वर्ल्ड कप खेळणार नसल्याचा दावा केला असला तरी आगामी आयपीएल स्पर्धा त्याच्या टीममधील निवडीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *