ज्यांना जायचं असेल त्यांनी खुशाल जावं, पण मनसे सोडणाऱ्यांची गय नाही, राज ठाकरेंची तंबी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २५ फेब्रुवारी । महाराष्ट्रातलं (maharashtra) राजकारण तापलेलं असताना अनेक नेत्यांनी महापालिका निवडणुकांच्या अनुशंगाने संवाद यात्रा आणि बैठका घ्यायला सुरू केल्या आहेत. महापालिकेवरती आपली सत्ता असावी असं प्रत्येकाला वाटतं असल्याने प्रत्येक ठिकाणी चुरस वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काल मनसेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी देखील मुंबईत नाशिकमधील (nashik) अनेक मनसेच्या नेत्यांची बैठक घेतली असून त्यामध्ये ज्यांना पक्ष सोडून जायचं असेल त्यांनी खुशाल जाव असं म्हणाल्याचे समजतंय. तसेच गेल्यानंतर होणा-या परिणामांना देखील सामोरे जा असा दम देखील कार्यकर्त्यांना दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या आगोदर बंड करणा-या अनेकांना तंबी दिल्याची चर्चा नाशिकमध्ये आहे. त्यामुळे नाशिकमधील महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेकजण नाराजी व्यक्त करीत बंड करतात, त्यासाठी ज्यांना जायचं असेल त्यांनी खुशाल जावं असं राज ठाकरेंनी मनसेच्या उपस्थित बैठकीत स्पष्ट सांगितलं. कारण अनेकदा अचानक निघून जाण्यापेक्षा आत्ता गेला तर बरं होईल असंही राज ठाकरे बोलल्याचं समजतंय. तसेच अनेक आलेल्या तक्रारीबाबत देखील उपस्थित कार्यकर्त्यांची कान उघाडणी देखील केली असल्याचे समजते. उपस्थित बैठकीत 170 इच्छुकांची यादी राज यांच्याकडे सादर करण्यात आली. राज ठाकरे त्यावर विचार विनिमय करून निवडणुकीच्या आगोदर उमेदवारांची यादी जाहीक करतील. नाशिकमधील मनसेचे मुंबईत झालेल्या बैठकीला अनेकजण उपस्थित राहिले होते, अनेकांची गैरहजेरी होती. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांची नाराजी देखील जाणून घेतली जाणार असल्याची राज ठाकरे यांनी सांगितले.

170 इच्छुकांची यादी राज यांच्याकडे सादर

राज ठाकरेंनी काल झालेल्या बैठकीत अनेकांना दम दिला असून ऐन वेळेला होणार बंड बंद व्हायला हवं, तसंच राज ठाकरे लवकरचं नाशिक दौऱ्यावर जाणार असून तिथल्या स्थानिक नेत्यांनी किंवा नाशिक दौरा झाल्यानंतर इच्छुकांची यादी जाहीर होईल. कारण तिथं जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचं समजतंय. महापालिकेच्या निवडणुकीला पुर्णपणे ताकदीने सामोरे जाण्याचा आदेश दिल्याने अनेक कार्यकर्त्यांना पुन्हा जोश आल्याचं चित्र मनसेच्या गोठात आहे. तसेच पदाधिका-यांना त्यांना थेट आदेश दिला आहे, की ज्यांना सोडून जायचं असेल, त्यांनी आत्ताचं जाव, तसेच पक्ष सोडून जाणा-यांची गय केली जाणार नाही असं त्यांनी म्हणटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *