Gold-Silver Rate Today : सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २६ फेब्रुवारी । सोन्याच्या किमतीमध्ये मागील काही दिवसात चढ-उतार सुरु आहे. भारतीय सराफा बाजारात, जिथे २४ फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किमतीत जोरदार झेप घेतली गेली, तिथे शुक्रवारी भारतातील सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली. आज २६ फेब्रुवारीला १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४६,८४० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,८५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,८४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दरही कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,१०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,८९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,१९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,९७० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,२४० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६४० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *