महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २७ फेब्रुवारी । ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम 24 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये (Australia Tour Of Pakistan) दाखल झाली आहे. दोन्ही देशांमध्ये या दौऱ्यात 3 टेस्ट, 3 वन-डे आणि 1 टी20 सामना खेळला जाणार आहे. या सीरिजमधील पहिली टेस्ट 4 मार्चपासून रावळपिंडीमध्ये सुरू होईल. यापूर्वी ऑस्ट्रेलियानं 1998 साली शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. त्यावेळी तीन टेस्ट मॅचची सीरिज ऑस्ट्रेलियानं 1-0 नं जिंकली होती.
पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्त्वाखालील ऑस्ट्रेलियन टीम चार्टर्ड विमानानं पाकिस्तानात दाखल झाली आहे. लाहोरमध्ये 2009 साली श्रीलंका टीमच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर विदेशी टीम पाकिस्तानमध्ये जाण्यास तयार नव्हत्या. मागील वर्षी न्यूझीलंड टीमनं पाकिस्तानमध्ये दाखल झाल्यानंतर पहिली मॅच सुरू होण्याच्या काही तास आधी सुरक्षेच्या कारणामुळे दौरा सोडण्याचा निर्णय घेतला होता.
यंदा बऱ्याच चर्चेनंतर ऑस्ट्रेलियन टीम पाकिस्तानात दाखल झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथनं (Steve Smith) सोशल मीडियावर पाकिस्तानात दाखल झाल्याचा फोटो शेअर केला आहे.
Arrived in 🇵🇰 pic.twitter.com/pnis0ckFeO
— Steve Smith (@stevesmith49) February 27, 2022
ऑस्ट्रेलियाच्या वनडे टीममधून (Australian Team) बरीच मोठी नावं गायब आहेत. डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, जॉश हेजलवूड, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क यांचा टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या खेळाडूंना आराम दिला आहे. वनडे सीरिजची सुरूवात 29 मार्चपासून होणार आहे. वनडे सीरिजचे सगळे सामने रावळपिंडीमध्ये होणार आहेत. पहिली वनडे 29 मार्च, दुसरी वनडे 31 आणि तिसरी वनडे 2 एप्रिलला होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा
पहिली टेस्ट- 4 ते 8 मार्च, रावळपिंडी
दुसरी टेस्ट- 12 ते 16 मार्च, कराची
तिसरी टेस्ट- 21 ते 25 मार्च, लाहोर
पहिली वनडे- 29 मार्च, रावळपिंडी
दुसरी वनडे- 31 मार्च, रावळपिंडी
तिसरी वनडे- 2 एप्रिल, रावळपिंडी
एकमेव टी-20- 5 एप्रिल, रावळपिंडी
ऑस्ट्रेलियन टेस्ट टीम
डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, कॅमरून ग्रीन, एश्टन एगर, ऍलेक्स कॅरी, जॉश इंग्लिस, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जॉश हेजलवूड, स्कॉट बोलंड, मार्क स्टीकटी, मिचेल स्वेपसन
ऑस्ट्रेलियन वनडे, टी-20 टीम
एरॉन फिंच (कर्णधार), सीन एबॉट, एश्टन एगर, जेसन बेहरनडॉर्फ, एलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, ट्रेविस हेड, जॉश इंगलिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, बेन मॅकडरमॉट, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, एडम झम्पा