महाराष्ट्र २४- ऑनलाईन :नवी दिल्ली : करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २४ मार्च रोजी मध्यरात्रीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला. आज या लॉकडाऊनचा सहावा दिवस आहे. करोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवसांसाठी किंवा महिन्यांसाठी वाढणार का? हा प्रश्न अनेकांना सतावतोय. जनतेच्या मनातील याच प्रश्नाचं उत्तर नकारार्थी देत केंद्र सरकारनं सामान्यांना दिलासा दिलाय.
करोना व्हायरसच्या कारणानं लागू करण्यात आलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन आणखी वाढवण्याची कोणतीही योजना नाही, असं सध्या तरी केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा यांनी, लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबद्दल सरकारची योजना नसल्याचं सांगितलंय. याउलट अशा प्रकारच्या बातम्या आणि रिपोर्ट पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्याचं गौबा यांनी म्हटलंय.