सातारा येथील वडूथमध्ये सलग ११ तास जंतुनाशक फवारणी;मदन भिमाजी साबळे, अध्यक्ष, छत्रपती उदयनराजे मित्र मंडळ, वडूथ सातारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन :सातारा / विशेष प्रतिनिधी;

सदर स्तुत्य उपक्रम ग्रामीण भागातील सर्वच ग्रामपंचायतींना आदर्श व अनुकरणीय.

जगभरात सध्या कोविड -19 आजाराच्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. शहरासह, ग्रामीण भागातही याचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सातारा तालुक्यातील वडूथ ग्रामपंचायतीने गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून रात्री ७ ते पहाटे ६ वाजेपर्यंत सलग ११ तास सोडिअम हायपोक्लोराईट व बैक्टोडेक्सची जंतूनाशकांची फवारणी केली. वडूथ वासीयांचा हा उपक्रम ग्रामीण भागातील सर्वच ग्रामपंचायतींना आदर्श व अनुकरणीय आहे!

वडुथ गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून, नागरिकांना सतत कोरोना संसर्गाबद्दल प्रबोधन पर माहिती दिली जात आहे. डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी तसेच औषधे व्यावसायिकांच्या मदतीने गावातील नागरिकांना माहिती देऊन घराबाहेर पडू नका, असे आवाहन गावोगावच्या ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे. वडुथ येथील या स्तुत्य उपक्रमाचे चौफेर स्तुती होत असून श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र मंडळाच्यावतीने अध्यक्ष मदन भिमाजी साबळे यांनी कौतुक केले आहे.

*यांनी घेतले परिश्रम*
जंतुनाशक फवारणीसाठी वडुथ ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर शिंदे, उपसरपंच नारायण साबळे, शिरीषकुमार शेंडे, अभिजित साबळे, गणेश साबळे, संतोष कांबळे, कमलाकर जगताप, मोहन जाधव, राजेंद्र गायकवाड, तात्या काकडे, संजय लोहार आदींनी यासाठी परिश्रम घेतले.

सातारा वडुथ ग्रामपंचायतीकडून नेहमीच अशा प्रकारच्या आणीबाणीच्या काळात योग्य उपाययोजनेसाठी ग्रामस्थांच्या हिताची पाऊले उचलली जातात. त्यामुळे त्यांचे कौतुक आणि आभार मानावे तेवढे कमीच आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्वच्छता आणि काळजी घेण्याच्या आवाहनाला आमच्या ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे खात्री आहे की कोरोना नक्कीच हरेल. आणि आपण जिंकू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *