महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २८ फेब्रुवारी । ‘समर्थ रामदास’ यांच्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांना कुणी विचारलं असतं? असं विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor bhagat singh koshyari) यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नवीन वाद पेटण्याची चिन्ह आहे. राज्यपालांच्या विधानावर आता प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे चर्चांना आणखी उधान आलं आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय तटकरे यांनी शरद पवारांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून त्यांनी राज्यपालांना खरे गुरू कोण, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय.
@maha_governor Koshiyari ji… please note correct lesson in history.
@supriya_sule @MumbaiNCP @NCPspeaks pic.twitter.com/8PrUUZqhSw— Sanjay Tatkare | संजय तटकरे (@tatkare_sanjay) February 28, 2022
शरद पवार यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, जे लोक सांगतात रामदास स्वामी महाराजांचे गुरू होते. ते खोटं आहे. शिवाजी महाराजांचे खरे गुरू जिजाऊ माता होत्या. त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जिजाऊंनी केलं. शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला, तर रामदास नव्हते.
शरद पवार यांचा हा व्हिडिओ एका जाहीर कार्यक्रमातला आहे. पुढे व्हिडिओत ते म्हणतात की, ज्यांच्या हातात लेखणी होती, त्यांनी ही कमाल केली. त्यांनी इतिहासात रामदास गुरू असल्याचं लिहून ठेवलं.