Petrol-Diesel Price Today: इंधन भडका उडणार; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २८ फेब्रुवारी । कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ होत असून याचा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. आज सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत ५ टक्क्यांची वाढ झाली. ब्रेंट क्रूडचा भाव १०२ डॉलर इतका झाला. मात्र तूर्त देशातील इंधन दरात आज कोणताही बदल झाला नाही. दरम्यान कच्च्या तेलाचा भाव वाढत असल्याने पेट्रोल-डिझेलमध्ये मोठी दरवाढ अपेक्षित आहे. त्याशिवाय घरगुती गॅस सीलिंडरमध्ये देखील मोठी वाढ होईल.

दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी सलग ११६ दिवस प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल डिझेल दर जैसे थे ठेवले आहेत.आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे. तर देशात सर्वात कमी दरात पेट्रोल आणि डिझेल दिल्लीजवळील नोएडा शहरात मिळत आहे. नोएडामध्ये आज एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.५१ रुपये आहे.

आज एक लीटर डिझेलचा मुंबईत ९४.१४ रुपये भाव आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे. नोएडामध्ये आज एक लीटर डिझेल दर ८७.०१ रुपये आहे.

रशियाने युक्रेनवर ताबा मिळवण्याच्या दृष्टीने जोरदार हल्ला सुरु केला आहे. मागील चार दिवस युद्धाची धग कायम आहे, यामुळे मध्य-पूर्वेत प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली असून तेलाच्या उत्पादन आणि पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे. मागील आठवडाभरात कच्च्या तेलाचा भाव २० टक्क्यांनी वाढला तर नैसर्गिक वायूच्या किमतीत जवळपास ३० टक्के वाढ झाली आहे.

दरम्यान, सध्या कच्च्या तेलाचा भाव सात वर्षांच्या उच्चांकावर असून तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठी दरवाढ होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय घरगुती गॅस सीलिंडरमध्ये देखील मोठी वाढ होईल, असे जाणकारांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *