महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ मार्च । सध्या जगभरात रशिया-यूक्रेन युद्धाची बरीच चर्चा आहे. दरम्यान अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अशाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून यामध्ये युक्रेनच्या एका शेतकऱ्याने ट्रॅक्टरला रशियाचा रणगाडा बांधल्याचं पाहायला मिळत आहे.
युक्रेनमधील एक शेतकरी रशियाला न घाबरता त्यांचा रणगाडाच आपल्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने पळवून नेत आहे. ऑस्ट्रियातील युक्रेनचे राजदूत ऑलेक्झांडर शेरबा (Olexander Scherba) यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. युक्रेनचा हा शेतकरी रस्त्यावर ट्रॅक्टरला रणगाडा बांधून ओढत असल्याचं व्हिडीओतून दिसून येतं आहे. तर एक व्यक्ती रणगाड्यामागे धावताना दिसत आहे. ‘हे जर खरं असेल तर शेतकऱ्याने पळवलेला हा पहिला रणगाडा असेल’ असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देखील त्यांनी म्हटलं आहे.
If true, it’s probably the first tank ever stolen by a farmer… ))
Ukrainians are tough cookies indeed. #StandWithUkraine #russiagohome pic.twitter.com/TY0sigffaM— olexander scherba🇺🇦 (@olex_scherba) February 27, 2022
एका रणगाड्याला दोरी बांधून एक शेतकरी तो टोईंग केल्याप्रमाणे आपल्या ट्रॅक्टरने खेचत घेऊन चालल्याचा हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे. ब्रिटीश खासदार जॉनी मेर्कर यांचाही यामध्ये समावेश आहे. “मी काही तज्ज्ञ नाही पण रशियाने केलेलं हे आक्रमण फारसं प्रभावी ठरताना दिसत नाही. आज एका युक्रेनियन ट्रॅक्टरने रशियाचा रणगाडा चोरुन नेला” अशा कॅप्शनसहीत ब्रिटीश खासदाराने हा व्हिडीओ शेअर केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. युक्रेनवर हल्ला करण्यासाठी निघालेल्या रशियन सैनिकाच्या एका घोडचुकीमुळे ते यूक्रेनच्या हाती लागलेत. आता हे दोन्ही सैन्य जवानांना यूक्रेननं कैद केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघंही रशियातून यूक्रेनवर हल्ला करण्यासाठी निघाले होते. परंतु त्यांनी गाडीतील पेट्रोल चेक केले नाही.