महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ मार्च । महाशिवात्रीनिमित्त महाराष्ट्र व देशभरातून अनेक शिवभक्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भिमाशंकरला दोन वर्षानंतर महाशिवरात्री भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत महाशिवरात्री निमित्ताने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या हस्ते शासकीय महापूजा आणि अभिषेक करण्यात आल यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांमध्ये मोठा उत्साह असुन भिमाशंकरला आजपासुन भक्तीचा महासागर ओसांडुन वाहतोय भक्तीमय वातावरणात सुरु झालेली महाशिवरात्रीची यात्रा देशभरातील नागरिकांना निरोगी आयुष्य देणारी व्हावी व आम्हाला काम करण्याची शक्ती मिळावी अशी भावना गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी व्यक्त केली.
माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर दोन वर्षानंतर महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली तर शिवमंदिर आणि सभामंडप विविध रंगाच्या फुळांनी सजविण्यात आला आहे. दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर भाविकांना श्री क्षेत्र भिमाशंकर दर्शनासाठी खुले करण्यात आले असुन आज महाशिवरात्रीचा उत्साह भाविकांमध्ये पहायला मिळत असुन आज मंदिर रात्री आणि दिवसभर दर्शनासाठी खुले रहाणार आहे.